Tuesday, February 27, 2018


व्हॉटस्ॲपवरील पीक विमा
यादीवर विश्वास ठेऊ नका
नांदेड, दि. 27 :-  खरीप हंगामातील सोयाबीन पीक विम्याच्या याद्या निरनिराळया व्हॉटस्ॲपग्रुपवर फिरत असल्याचे दिसून येत आहेत. अनेक पानांची पीडीएफ फाईल व्हॉटसॲपवर आल्यावर आपले नाव त्यात आहे का हे पाहण्याचा शेतकरी प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहेत. परंतु शासनाने अद्याप पीक विमा जाहिर केलेला नाही. खरीप पिकांचा पीक विमा जाहिर करण्याचे प्रयत्न शासनस्तरावर सुरु आहेत. लवकरच खरीप पिक विमा जाहिर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या व्हॉटस्ॲपवर फिरत असलेल्या यादीवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ. तुकाराम मोटे यांनी केले आहे.
00000

No comments:

Post a Comment

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...