Tuesday, November 7, 2017

लोकन्यायालयात लेंडी प्रकल्पाचे प्रकरणे
तडजोडीने काढण्यासाठी पुर्वतयारीची बैठक संपन्न
नांदेड दि. 7 :- कंधार व मुखेड न्यायालयात शनिवार 9 डिसेंबर 2017 रोजी होणाऱ्या लोकन्यायालयाच्या पुर्व तयारीबाबत बैठकीचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. या बैठकीत वर्ग एक जिल्हा न्यायाधिश व्ही. एस. गायके, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डी. टी. वसावे, दिवाणी न्यायाधीश आर. जे. तांबे, सहदिवाणी न्यायाधीश एस. व्ही. स्वामी, एस. बी. काळदाते, श्रीमती एन. एम. बिरादार, अॅड. विजय पाटील तसेच कंधार येथील बार असोसीएशनचे अध्यक्ष डी. के.पांचाळ व मुखेड येथील बार असोसिएशनचे सदस्य श्री. येवतीकर, सदस्य उपस्थित होते.  
या बैठकीत लोकन्यायालयात जास्तीत जास्त प्रकरणे ठेवुन तडजोड करुन निकाली काढण्याबाबत बैठक घेण्यात आली. तसेच लेंडी प्रकल्पाची प्रकरणे लोकन्यायालयात ठेवुन तडजोड करून निकाली काढण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच लेंडी प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी 1 कोटी रुपयाचा धनादेश न्यायालयात दाखल केला व तो बॅंकेत जमा करण्यात आला, असे संबंधीत प्रकल्प अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
            लेंडी प्रकल्पाचे जास्तीतजास्त प्रकरणे निकाली काढण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव,  डी. टी. वसावे यांनी मार्गदर्शन केले. राष्ट्रीय लोकन्यायालयाची माहिती दयावी, असे  आवाहन श्री. वसावे यांनी केले आहे.

000000

No comments:

Post a Comment

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...