Monday, August 14, 2017

कर सहायक परीक्षा केंद्र
परिसरात प्रतिबंधात्मक आदेश
नांदेड, दि. 14 :- महाराष्ट्र लोकसेवा आयोग कर सहाय्यक परीक्षा- 2017 ही रविवार 20 ऑगस्ट 2017 रोजी नांदेड शहरातील 17 केंद्रावर सकाळी 10.30 ते दुपारी 12 वाजेपर्यंत होणार आहे. या परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश  लागू  केल्याचे जिल्हादंडाधिकारी  नांदेड  यांनी कळवले आहे. 
या परीक्षेचे कामकाज सुरळीत व शांततेत पार पडावे यासाठी परीक्षा केंद्रांच्या 100 मीटर परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये सकाळी 8 ते दुपारी 2 वाजेपर्यंत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी, कर्मचारी या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. तसेच यावेळेत परीक्षा केंद्राच्या परिसरातील 100 मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स, एसटीडी, आयएसडी, भ्रमणध्वनी, फॅक्स, झेरॉक्स आणि ध्वनीक्षेपक चालू ठेवण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे. 

000000

No comments:

Post a Comment

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...