Thursday, July 27, 2017

कर्करोग सप्ताह निमित्त
तपासणी शिबिराचे आयोजन
नांदेड, दि. 27 :- जागतिक मौखिक, डोके, मान व चेहरा कर्करोग सप्ताह निमित्त श्री गुरु गोबिंद सिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालयात कान, नाक, घसा व मौखिक कर्करोग मोफत तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरात गरजू रुग्णांनी तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. पी. कदम यांनी केले आहे.      
राष्ट्रीय तंबाखू  नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जागतिक मौखिक, डोके, मान व चेहरा कर्करोग दिन व सप्ताह 27 जुलै ते 5 ऑगस्ट 2017 पर्यंत जिल्हा रुग्णालयात साजरा करण्यात येणार आहे. रुग्णालयातील रुग्ण व त्यांचे नातेवाईकांना कर्करोगाविषयी तज्ज्ञांमार्फत आज मार्गदर्शन करण्यात आले. अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एच. आर. गुंटूरकर यांनी तंबाखु सेवनामुळे कर्करोगाचे प्रमाण सर्वाधिक होते. समाजात तंबाखु दुष्परिणामाची जनजागृती होणे आवश्यक असल्याचे सांगितले.
000000


No comments:

Post a Comment

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...