Thursday, June 29, 2017

रास्तभाव धान्य दुकानात
जुलैसाठी साखर उपलब्ध
नांदेड दि. 29 :- सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारकांसाठी जुलै 2017 करीता साखर रास्तभाव धान्य दुकानात उपलब्ध झाल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी  नांदेड  यांनी कळवले आहे. 
या नियतनानुसार प्रती  शिधापत्रिका एक किलो याप्रमाणे मंजूर केले आहे. जिल्ह्यासाठी 748.06 क्विंटल साखरेचा पुरवठा उपलब्ध झाला आहे. तालुका निहाय उपलब्ध साखर पुढील प्रमाणे क्विंटल मध्ये : नांदेड व लोहा- 6.5, हदगाव- 67.7, किनवट- 154, भोकर- 37, बिलोली- 56.48, देगलूर- 49, मुखेड- 67.31, कंधार- 43.07, लोहा- 35, अर्धापूर- 15, हिमायतनगर- 33, माहूर- 65, उमरी- 28, धर्माबाद- 25, नायगाव- 50, मुदखेड- 16. सर्व अंत्योदय शिधापत्रिकाधारकांनी स्वस्त धान्य दुकानातून साखरेची उचल करावी, असे आवाहन  जिल्हा पुरवठा अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
0000000



No comments:

Post a Comment

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...