Friday, March 3, 2017

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरात
र‍विवारी रुपेश जैन यांचे व्याख्यान
            नांदेड दि. 3 :- स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय सेतू समिती, नांदेड वाघाळा शहर महानगरपालीका, जिल्हा ग्रंथालय अ‍धिकारी यांच्यावतीने “उज्ज्वल” नांदेड माहिमेअतंर्गत रविवार 5 मार्च 2017 रोजी सायंकाळी 4.30 वा. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये  डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह नांदेड येथे “CSAT  व चालू घडामोडी” या विषयांवर रुपेश जैन हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.  
यावेळी नांदेडचे मनपा आयुक्त समीर उन्हाळे, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या शिबिरास उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजकाच्यावतीने करण्यात आले आहे.

00000000

No comments:

Post a Comment

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...