Saturday, February 18, 2017

  “उज्ज्वल नांदेड” अंतर्गत सोमवारी
मार्गदर्शन शिबिरात भस्के यांचे व्याख्यान
नांदेड दि. 18 :-  स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने सुरु करण्यात आलेल्या “उज्ज्वल नांदेड” अभियानांतर्गत सोमवार 20 फेब्रुवारी 2017 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह नांदेड येथे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात पुणे येथील डॉ. सचिन भस्के हे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या संदर्भातील सामान्य  विज्ञान या विषयाची तयारी कशी करावी याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. या शिबारास नांदेड वाघाळा महानगरपालिकेचे आयुक्त समीर उन्हाळे, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांची उपस्थिती राहणार आहे.
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या महत्वपूर्ण शिबिरात उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालय सेतू समिती, नांदेड वाघाळा महानगरपालिका व जिल्हा ग्रंथालय कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.

000000

No comments:

Post a Comment

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...