शासकीय वसतिगृहात पालक मेळावा
संपन्न
नांदेड, दि.
24 :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य
विभागाअंतर्गत मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह नांदेड येथे नुकताच वसतिगृहातील
विद्यार्थी व पालकांचा मेळावा संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सायन्स
कॉलेजचे प्राचार्य डॉ. डी. यु. गवई उपस्थित होते. मार्गदर्शक म्हणून यशवंत
महाविद्यालयाचे प्रा. डॉ. एस. बी. चव्हाण, प्रमुख पाहुणे सेवानिवृत्त उपप्राचार्य पी. डी.
माने यांचीही यावेळी उपस्थिती होती.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी वसतिगृहातील कर्मचारी
यु. के. गजभारे, एम. एन. फड, कैलास कांबळे, ए. बी. गायकवाड, बी. के. नरवाडे, एस.
एन. कांबळे, श्रीमती आर. एल. मुद्देवाड, श्रीमती के. डी. वाघमारे यांनी संयोजन
केले.
00000000

No comments:
Post a Comment