Monday, January 9, 2017

तूर, हरभरा पिक संरक्षणाबाबत कृषि सल्ला  
नांदेड, दि. 9 :-  जिल्ह्यात तूर व हरभरा पिकासाठी किड व रोग सर्वेक्षण या प्रकल्पांतर्गत काम सुरु आहे. पिकाच्या किडीपासून संरक्षणासाठी कृषि विभागाने संदेश दिला आहे.
तूर पिकांवरील शेंगा खाणाऱ्या अळ्याच्या नियंत्रणासाठी फ्लुबेंडीएमाइड 39.35 टक्के एससी 0.2 मिली किंवा इंडोक्झाकार्ब 14.5 टक्के एससी 0.8 मिली प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारावे. हरभरावरील घाटेअळीसाठी इमामेक्टीन बेन्जोएट 5 टक्के 0.4 ग्रॅम प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारावे. मर रोगासाठी कार्बन्डेन्जीम 2 ग्रॅम प्रती लिटर पाण्यात मिसळून अळवनी करावा, असे आवाहन नांदेडचे उपविभागीय कृषि अधिकारी डॉ. व्ही. व्ही. भरगंडे यांनी केले आहे.

0000000

No comments:

Post a Comment

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...