वृत्त क्रमांक 1032
राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान योजनेअंतर्गत
15 ऑक्टोबरपर्यत सूचना, आक्षेप, हरकती करावेत नांदेड दि. 30 सप्टेंबर :- राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान योजनेअंतर्गत 50 व्या ग्रंथ भेट योजनेसाठी निवड झालेल्या ग्रंथाची मराठी, हिंदी व इंग्रजी यादी ग्रंथालय संचालनालयाच्या www.dol.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर 15 ऑक्टोबर 2025 या कालावधीत खुली ठेवण्यात आली असून या मुदतीत सूचना, हरकती, आक्षेप मागविण्यात आले आहेत.
तसेच शासनमान्य ग्रंथाच्या यादीसाठी सन 2024 मध्ये प्रकाशित झालेल्या मराठी भाषेतील ग्रंथाची निवड करण्यासाठी ग्रंथ यापुर्वी ग्रंथालय संचालनालयास पाठविले नसल्यास ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय, नगर भवन टाऊन हॉल मुंबई-400001 या पत्त्यावर 15 ऑक्टोबर 2025 पर्यत पाठविण्यात यावीत, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी अ.वा. सुर्यवंशी यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment