वृत्त क्र. 778
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचा दौरा कार्यक्रम
नांदेड दि. 30 जुलै :- राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री शिवेंद्रराजे भोसले हे दोन दिवसाच्या नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.
गुरुवार 31 जुलै 2025 रोजी देवगिरी एक्सप्रेसने सकाळी 8.50 वा. हुजुर साहेब नांदेड येथे आगमन व मोटारीने शासकीय विश्रामगृह नांदेडकडे प्रयाण करतील. सकाळी 9.10 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. दुपारी 2.45 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथून भारतीय जनता पार्टी महानगर कार्यालय शिवाजीनगर औद्योगिक वसाहत प्लाझा नाना नानी पार्कच्या समोर नांदेडकडे प्रयाण. दुपारी 3 ते सायं 5 वाजेपर्यंत भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक स्थळ- भारतीय जनता पार्टी महानगर कार्यालय शिवाजीनगर नाना नानी पार्कच्या समोर नांदेड. सायं 5 वा. भारतीय जनता पार्टी महानगर कार्यालय शिवाजीनगर नांदेड येथून कुसुम गोकुळनगर पिपल्स हायस्कुल समोर कुसूम बाळ रुग्णालय नांदेडकडे प्रयाण. सायं 5.10 वा. डॉ. सुधीर कोकरे कार्यवाह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांची सदिच्छा भेट. स्थळ- कुसूम गोकुळनगर कुसूम बाळ रुग्णालय नांदेड. सायं 5.30 वा. गोकुळनगर येथून शासकीय विश्रामगृह नांदेडकडे प्रयाण. सायं. 5.45 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व मुक्काम.
शुक्रवार 1 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी 12.30 वाजेपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक. स्थळ- बैठक कक्ष मिनी सह्याद्री शासकीय विश्रामगृह स्नेहनगर नांदेड. दुपारी 12.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथून सचखंड गुरूद्वारा गुरूद्वारा रोड यात्री निवास रोड नांदेडकडे प्रयाण. दुपारी 12.35 वा. सचखंड गुरूद्वारा नांदेड येथे भेट. दुपारी 12.55 वा. सचखंड गुरूद्वारा गुरूद्वारा रोड नांदेड येथून शासकीय विश्रामगृह नांदेडकडे प्रयाण. दुपारी 1 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन. दुपारी 1 ते सायं 5 वाजेपर्यंत राखीव. सायं 5 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथून श्री गुरू गोबिंद सिंघजी विमानतळ नांदेडकडे प्रयाण. सायं. 5.15 वा. श्री गुरू गोबिंद सिंघजी विमानतळ नांदेड येथे आगमन. सायं 6.10 वा. श्री गुरुगोबिंद सिंघजी विमानतळ नांदेड येथून विमानाने पुणेकडे प्रयाण करतील.
0000
No comments:
Post a Comment