वृत्त क्र. 779
राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांचा दौरा
नांदेड दि. 30 जुलै :-राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.
सोमवार 4 ऑगस्ट 2025 रोजी मुंबई येथून सकाळी 9 वा. नांदेड येथे आगमन व शासकीय विश्रामगृह कडे रवाना. सकाळी 11.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे अप्पर जिल्हाधिकारी तथा जिल्हा तक्रार निवारण अधिकारी यांचे समवेत एईपीडीएस अंतर्गत नियतन, उचल व वाटपाचा आढावा. दुपारी 12 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे शिक्षणाधिकारी प्राथमिक व प्रशासकीय अधिकारी शा.पो.आ यांचे समवेत शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत नियतन, उचल व वाटपाचा आढावा. जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा बाल रोग तज्ञ व मनपा बाल रोग यांचेसमवेत कुपोषीत बालकांबाबत आढावा. तसेच एनआरसीमध्ये गत 2 वर्षात दाखल बालकांबाबतचा अहवाल. दुपारी 1 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा कार्यक्रम अधिकारी व प्रकल्प अधिकारी शहरी व ग्रामीण यांचे समवेत महिला व बाल विकास सेवा योजनेअंतर्गत नियतन, उचल व वाटपाचा आढावा. दुपारी 2.30 वा. जिल्ह्यातील तृतीयपंथी संघटना, भीकमुक्ती संदर्भीय काम करणाऱ्या संघटना, वेश्याव्यावसायिक यांच्याशी संलग्न संघटना, आदिवासी तालुक्यांना भेटी, शा. पो.आ.अंतर्गत बचतगट आयसीडीसी अंतर्गत बचतगट, गलीच्छवस्तींना भेटी, शासकीय धान्य गोदाम, शालेय पोषण आहार पुरवठादार गोदामे, महिला व बाल विकास सेवा योजना पुरवठादार गोदामांना भेटी तसेच केंद्रीय स्वयंपाकगृह, शाळा, अंगणवाडी, स्वच्छ धान्य दुकानांना भेटी. सायंकाळी 6 वा. शासकीय विश्रामगृहाकडे रवाना व मुक्काम.
मंगळवार 5 ऑगस्ट रोजी सकाळी 10.30 ते 6 पर्यत आदिवासी तालुक्यांना भेटी, शासकीय धान्य गोदामे, महिला व बाल विकास सेवा योजना पुरवठादार गोदामांना भेटी, शा.पो.आ व आयसीडीएस अंतर्गत बचतगट यांना भेटी तसेच केंद्रीय स्वयंपाकगृह शाळा, अंगणवाडी, स्वस्त धान्य दुकानांना भेटी.
बुधवार 6 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10.30 ते 6 पर्यत आदिवासी तालुक्यांना भेटी, शासकीय धान्य गोदाम, शालेय पोषण आहार पुरवठादार गोदामे, महिला व बाल विकास सेवा योजना पुरवठादार गोदामांना भेटी, शा.पो.आ. व आयसीडीएस अंतर्गत बचतगट यांना भेटी तसेच केंद्रीय स्वयंपाकगृह शाळा, अंगणवाडी, स्वस्त धान्य दुकानांना भेटी . सायंकाळी 7 वा. वाहनाने नांदेड येथून मुंबईकडे प्रयाण करतील.
00000
No comments:
Post a Comment