आयआयपीएच्या अध्यक्षपदी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले तर सचिवपदी प्रा. बालाजी कतुरवार यांची निवड
नांदेड दि. १४ एप्रिल:- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन अर्थात आयआयपीएच्या नांदेड शाखेच्या अध्यक्षपदी आज जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
आयआयपीए नवी दिल्ली ही भारत सरकारच्या कर्मचारी , लोकतक्रार व निवृत्तीवेतन मंत्रालयाअंतर्गत लोकप्रशासन विकास , संशोधन व प्रशासकीय सुधारणा या क्षेत्रात कार्य करणारी एक मूलभूत संशोधन व प्रशिक्षण संस्था आहे.
केंद्र शासनाच्या संस्थेअंतर्गत आय आयपीएची नांदेड शाखा स्थापन करण्यात आली आहे.
नांदेड जिल्हा प्रशासनाच्यावतीने स्थानिक प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी वर्गाला प्रशिक्षण देण्यासाठी, प्रशासकीय क्षमता बांधणी विकसित करण्यासाठी आणि प्रशासकीय सुधारणेच्या अनुषंगाने लोकप्रशासन विषयात लेखन, संशोधन व प्रशिक्षण विषयी विविध कार्य करण्यासाठी आयआयपीएची नांदेड शाखा स्थापन करण्यात आली आहे.
नवीन कार्यकारिणी निवड करण्यासाठी दिनांक 14 एप्रिल 2025 रोजी जिल्हाधिकाऱ्याच्या कक्षात आयआयपीएचे महाराष्ट्र राज्य विभागीय केंद्राचे सचिव तथा नांदेड गुरुद्वारा बोर्डाचे अध्यक्ष श्री.विजय सतबीरसिंग यांच्या अध्यक्षतेख़ाली बैठक घेण्यात आली.
या बैठकीत नांदेड शाखा कार्यकारी मंडळाची बिनविरोधपणे निवड करण्यात आली.
यामध्ये नांदेड शाखा पदसिद्ध अध्यक्ष म्हणून नांदेडचे जिल्हाधिकारी श्री. राहुल कर्डिले तर सचिव म्हणून देगलूर महाविद्यालय देगलूर येथील लोकप्रशासन विभाग व संशोधन केंद्रप्रमुख प्रा. डॉ. बालाजी कतुरवार यांची निवड करण्यात आली. तर कोषाध्यक्ष म्हणून पीपल्स महाविद्यालय नांदेड येथील प्रा. डॉ. अमोल काळे यांची निवड करण्यात आली आहे.
आयआयपीए नांदेड शाखा
कार्यकारी मंडळ पदसिद्ध सदस्य म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांची निवड करण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये आयआयपीएची शाखा स्थापन झाल्यामुळे नांदेड जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध लोककल्याणकारी योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे करणे, माहिती व तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रशासकीय सेवा सुलभ, पारदर्शक व गतीशील बनवीने, विविध विकास कामांमध्ये लोकसहभाग वाढविणे, प्रशासकीय अधिकारी वर्गांना वेळोवेळी प्रशिक्षण देऊन शारीरिक , मानसिक , बौद्धिक व नैतिक क्षमता विकसित करणे, लोककल्याणकारी व संवेदनशील प्रशासन व्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रशासकीय अधिकारी, लोकप्रशासन विषयाचे प्राध्यापक व संशोधक यांच्यात विचारमंथन करण्यासाठी आयआयपीएची नांदेड शाखा एक वरदान ठरणार आहे.
आयआयपीए नांदेड शाखा कार्यकारी मंडळ सदस्य म्हणून प्राचार्य डॉ. राम जाधव , अरविंद नळगे, डॉ. व्यंकट विळेगावे, दिनेश मूनगीलवार, डॉ. वामन कळमसे , डॉ. रवी बरडे, डॉ. दीपक वाघमारे, डॉ. विजय तरोडे ; डॉ. मिर्झा बेग यांची यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
प्रस्तुत बैठकीला आयआयपीए महाराष्ट्र विभागीय शाखेचे कार्यकारी मंडळ सदस्य डॉ. प्रदीप लोंढे , श्री किरण चिद्रावार डॉ. बाळासाहेब भिंगोले प्रा. शंकर लेखने यांनाही निमंत्रित सदस्य म्हणून निवडण्यात आले.
या बैठकीस नांदेड जिल्ह्यातील विविध प्रशासकीय अधिकारी, लोकप्रशासन विषयातील प्राध्यापक व संशोधक उपस्थित होते.
0000





.jpeg)


No comments:
Post a Comment