वृत्त क्रमांक 1075
नांदेड जिल्ह्यात 5 हजार 146 क्विंटल रब्बी बियाणे वाटपाचा लक्षांक
नांदेड दि. 10 ऑक्टोबर :- राष्ट्रीय अन्न आणि पोषण सुरक्षा अभियान कडधान्ये, पौष्टिक तृणधान्ये पिके अंतर्गत 5 हजार 146 क्विंटल प्रमाणित बियाणे वितरित करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर शेतकरी लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे.
हरभरा पिकाच्या 10 वर्षाआतील वाणासाठी 5 हजार रुपये प्रति क्विंटल व 10 वर्षांवरील वाणासाठी 2 हजार 500 रुपये प्रति क्विंटल अनुदान देय असून, जिल्ह्याकरिता 10 वर्षाआतील वाणाकरिता 2160 क्विंटल व 10 वर्षा वरील वाणांकरिता 2181 क्विंटल लक्षांक प्राप्त झाला आहे.
रब्बी ज्वारीच्या 10 वर्षाआतील वाणासाठी 3 हजार रुपये प्रति क्विंटल व 10 वर्षांवरील वाणासाठी 1 हजार 500 रुपये प्रति क्विंटल अनुदान देय असून, जिल्ह्याकरिता 10 वर्षाआतील वाणाकरिता 100 क्विंटल व 10 वर्षांवरील वाणांकरिता 260 क्विंटल लक्षांक प्राप्त झाला आहे.
गहू पिकाच्या 10 वर्षाआतील वाणासाठी 2 हजार रुपये प्रति क्विंटल वं 10 वर्षांवरील वाणासाठी 1 हजार रुपये प्रति क्विंटल अनुदान देय असून, जिल्ह्याकरिता 10 वर्षाआतील वाणाकरिता 298 क्विंटल व 10 वर्षांवरील वाणांकरिता 147 क्विंटल लक्षांक प्राप्त आहे.
प्रमाणित बियाणे वितरण या घटकातंर्गत आर्थिक सहाय्य प्रति शेतकरी किमान 20 गुंठे ते कमाल 1 हेक्टर पर्यंत मर्यादित आहे. वैयक्तिक शेतकरी यांनी संबंधित महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ/राष्ट्रीय बीज निगम लिमिटेड/ कृषक भारती को-ऑपरेटिव्ह लिमिटेड यासंस्थेच्या अधिकृत वितरकांमार्फत प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वांवर लाभार्थी निवड करण्यात येत आहे. त्यासाठी अॅग्रीस्टॅक फार्मर आयडी (Agristack), आधार कार्ड, ७/१२ उतारा आदी कागदपत्रे आवश्यक आहेत.
अधिक माहितीसाठी गावचे सहाय्यक कृषी अधिकारी, उप कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. तसेच शेतक-यांनी उत्स्फूर्तपणे याबाबीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.
0000
No comments:
Post a Comment