वृत्त क्रमांक 925
लोहा तालुक्यातील सर्वच मंडळात अतिवृष्टीची नोंद
नुकसानीचे पंचनामे करणे सुरू
नांदेड दि. 30 ऑगस्ट :- लोहा तालुक्यात शुक्रवार 29 ऑगस्ट रोजी सकाळी 3 वा. पासून मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे सर्वच मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. लोहा नगरपरिषद हद्दीतील सिद्धार्थनगर, इंदिरानगर, साईगोल्डन सिटी व कलालपेठ या भागात जवळपास 80 घरांमध्ये पाणी गेले होते. घरातील 35 ते 40 रहिवाशांना स्थानिक नागरीकांच्या मदतीने महसूल, पोलिस व नगरपरिषद प्रशासनाने सुखरुप बाहेर काढले.
त्यांची जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत तात्पुरत्या निवाराची व्यवस्था केली. तसेच साधारणतः 400 लोकांच्या जेवणाची तात्काळ व्यवस्था केली. तसेच लोहा तालुक्यातील 56 मयत जनावरे, 157 घरपडीचे पंचनामे व शेतपीक नुकसानीचे पंचनामे करण्यात येत आहेत, अशी माहिती तहसिलदार लोहा यांनी दिली आहे.
0000
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
No comments:
Post a Comment