Friday, August 29, 2025

वृत्त क्रमांक  922

मेजर ध्यानचंद यांचा जन्म दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणुन उत्साहात संपन्न 

नांदेड दि. 29 ऑगस्ट :-मेजर ध्यानचंद (हॉकीचे खेळाडू) यांचा 29 ऑगष्ट हा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणुन देशभरात साजरा करण्यात येतो. त्यानुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद नांदेड, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड व नांदेड जिल्हा सेपकटाकरॉ असोसिएशनच्यावतीने आज 29 ऑगस्ट रोजी ऑलप्मिक वीर मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन हा राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात आला. याप्रसंगी 26 वी महाराष्ट्र ज्युनिअर राज्यस्तर सेपकटाकरॉ स्पर्धा सन 2025-26 चे उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला.

राष्ट्रीय क्रीडा दिन निमित्त 29 ऑगस्ट 2025 रोजी सकाळच्या सत्रात मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन शपथ घेण्यात आली. तर सांयकाळ सत्रातील कार्यक्रमप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणुन आमदार बालाजी कल्याणकर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन जिल्हा पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार,  जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे, नांदेड जिल्हा सेपकटाकरॉ असो. सचिव प्रवीण कुपटीकर, श्रीमती शिवकांता देशमुख (राज्य क्रीडा मार्गदर्शक तथा कार्यक्रम प्रमुख), रवीकुमार बकवाड (सेपकटाकरॉ असोसिएशन,नांदेड) आदी मान्यवर उपस्थित होते. 

याप्रसंगी आमदार बालाजी कल्याणकर यांनी उपस्थित खेळाडू व प्रशिक्षक यांना राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या व स्पर्धेच्या शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेकरीता राज्यातील विविध जिल्हयातील खेळाडूंनी सहभाग घेतला. तसेच राष्ट्रीय क्रीडा दिन निमीत्त दि. 29 ऑगस्ट 2025 रोजी सांयकाळच्या सत्रात क्रीडा दिन सप्ताह निमीत्त राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग तथा प्राविण्य संपादन केलेल्या खेळाडूंचा, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देवून उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते गौरव करण्यात आला.

आमदार व जिल्हा पोलीस अधिक्षक नांदेड यांनी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमीत्त विजेत्या खेळाडू, पुरस्कारार्थी यांचा सन्मान करुन पुढील भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. 

कार्यक्रम यशस्वी करणेकरीता जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांचे मार्गदर्शनाखाली कार्यक्रम प्रमुख राज्य क्रीडा मार्गदर्शक श्रीमती शिवकांता देशमुख हे होते. तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी तालुका क्रीडा अधिकारी विजय काकडे, क्रीडा अधिकारी संजय बेतीवार, राज्य क्रीडा मार्गदर्शक बालाजी शिरसीकर, चंद्रप्रकाश होनवडजकर, क्रीडा अधिकारी राहुल श्रीरामवार, कनिष्ठ लिपीक दत्तकुमार धुतडे कार्यालयातील संजय चव्हाण, आकाश भोरे, हनमंत नरवाडे, मोहन पवार, सुभाष धोंगडे, विद्यानंद भालेराव, चंद्रकांत गव्हाणे, यश कांबळे व सोनबा ओव्हाळ तसेच नांदेड जिल्हा सेपकटाकरॉ असोसिएशनचे खेळाडू, प्रशिक्षक आदीनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन बालाजी शिरसीकर यांनी केले तर आभार प्रदर्शन संजय बेतीवार यांनी मानले.

00000






No comments:

Post a Comment

    वृत्त हिंद की चादर समागम कार्यक्रमातून आज लाखो भाविक घेणार प्रेरणा  ▪️उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री देवेंद्र फडण...