वृत्त क्रमांक 812
समाजातील खऱ्या गरजू लाभार्थ्यांना शोधून लाभ द्या -
महेश ढवळे
दिव्यांग, तृतीयपंथी व समाजातील वंचित
घटकांना शिधापत्रिका वाटप
नांदेड दि. 5 ऑगस्ट : समाजातील खऱ्या लाभार्थ्यांना शोधून त्यांना योजनांचा लाभ मिळवून
द्या. तसेच राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमांची प्रभावीपणे अंमलबजावणी करा, असे प्रतिपादन राज्य
अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांनी केले.
आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनच्या कॅबिनेट
सभागृहामध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा पुरवठा
अधिकारी डॉ. जगदीश बारदेवाड, लेखाधिकारी निळकंठ पांचगे, डॉ. सान्वी जेठवाणी, जिल्ह्यातील दिव्यांग, तृतीयपंथी आदीची
उपस्थिती होती.
समाजातील खरे गरजू लाभार्थी ओळखून त्यांना लाभ मिळवून
द्यावा. ज्यांचे उत्पन्न जास्त आहे असे लोक लाभ घेत असतील तर अशा लोकांना शोधा
त्यांच्यावर कारवाई करता येईल असेही अध्यक्ष श्री. ढवळे यांनी सांगितले. आज
समाजातील वंचित घटकांचा शोध घेवून त्यांना लाभ देण्याची कार्यवाही केली यांचे
समाधान व्यक्त करुन त्यांनी जिल्हा प्रशासनाचे आभार मानले.
दिव्यांग, तृतीयपंथी यांच्यासह समाजातील
वंचित घटकांना शिधापत्रिका वाटप
नांदेड तालुक्यातील 17 व अर्धापूर तालुक्यातील 8
दिव्यांग, तृतीयपंथी यांच्यासह वंचित घटकातील लाभार्थ्यांना, ज्यांना आतापर्यंत
कधीच लाभ मिळाला नव्हता अशा लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात शिधापत्रिका
अध्यक्ष महेश ढवळे यांच्या हस्ते वाटप करण्यात आल्या.
यामध्ये देविदास गंधकावड, बिजली शहानूर बक्श, इरम फरीदा बकश या
तृतीयपंथी व मुन्नी शेख हुजूर, गोदावरी राऊत, पुंडलिक कोडिंबा मामीलवाड, शिवनंदाबाई नागोराव
जोगदंड, वसीम खान, चंदाप्रकाश पाटणी, समरीन बेगम, वंदना आदित्य पाटील, शशिकला मारोती स्वामी, फहरीन
बेगन, नसरीन
बेगम, मुख्तार
चाँद, मोहम्मद
हाजी, मौहमद
बाकर ईस्माईल यांना तर अर्धापूर तालुक्यातील सय्यद शाहीन सय्यद
मुजीब, शेख
सुलतान शेख शबीर, सुमन चांदु खरुसकर, सुनिता रामकिशन सरवदे, प्रिती बाळू लोणे, रेखा काशिनाथ वाघमारे, शिवकन्या परमेश्वर
कपाटे, प्रमिला
दिलीप कांबळे यांना शिधापत्रिका वाटप करण्यात आल्या.
00000
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
No comments:
Post a Comment