वृत्त क्रमांक 798
उच्च शिक्षण
घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह योजना सुरू
नांदेड दि. 1 ऑगस्ट :- इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत राबविण्यात येत असलेल्या विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह योजना सुरू झाली आहे. वसतिगृहात प्रवेशित विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी भोजन निवास व शैक्षणिक साहित्यासाठी त्यांच्या आधारसंलग्न बँक खात्यामध्ये थेट रक्कम वितरीत करण्यात येते.
जिल्ह्यात उच्च
शिक्षण घेणाऱ्या बी.ए./बी.कॉम/बी.एस.सी./एम.ए./एम.एस.सी.अशा बिगर व्यावसायिक प्रथम वर्षातील अभ्यासक्रमाच्या
प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी सन 2025-26 वर्षांसाठी या योजनेचे अर्ज मागविण्यात आली
आहेत. शासकीय वसतिगृह योजनेचे ऑनलाईन अर्ज https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर 17 ऑगस्ट 2025
पर्यंत विहित वेबसाईटमध्ये भरावे, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याणचे सहाय्यक संचालक
शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment