Thursday, July 3, 2025

वृत्त क्र. 695    

ज्येष्ठ साहित्यिक व कलावंतांना मानधन योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन 

नांदेड, दि. 3 जुलै :- राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजनेंतर्गत कला व साहित्य क्षेत्रातील योगदान असलेल्या मान्यवर साहित्यिक व कलावंतांनी सन 2025-26 साठी ऑनलाईन अर्ज येत्या 31 जुलैपर्यंत करावेत, असे जास्तीत जास्त ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. पात्र लाभार्थ्यांना https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en या लिंकवर जाऊन ऑनलाइन अर्ज भरता येतील. 

राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजना ही सन 1954-55 या वर्षापासून संपूर्ण राज्यात सांस्कृतिक कार्य संचालनालय मार्फत राबविण्यात येते. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या शासन निर्णयानुसार कला व साहित्य क्षेत्रातील योगदान असलेल्या मान्यवर साहित्यिक व कलावंत यांना प्रति महिना एप्रिल 2024 पासून सरसकट 5 हजार रुपये एवढे मानधन देण्यात येत आहे. तसेच दरवर्षी नांदेड जिल्हाअंतर्गत 100 कलावंताची निवड जिल्हा निवड समिती मार्फत करण्यात येते. 

योजनेसाठी पात्रता

ज्याचे वय 50 पेक्षा जास्त, दिव्यांगाना वयाची अट 10 वर्षानी शिथिल करण्यात येते (दिव्यांगाना वयोमर्यादा 40 वर्ष) आहे. ज्याचे कला व साहित्य क्षेत्रातील योगदान कमीत कमी 15 वर्ष आहे. ज्यांनी साहित्य व कलाक्षेत्रात सातत्यपूर्ण, दर्जेदार व मोलाची भर घातली आहे. वयाने ज्येष्ठ असणारे, विधवा, परितक्त्या, दिव्यांग कलाकारांना प्राधान्य राहील. कलाकारांचे सर्व मार्गांनी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 60 हजार रुपयापेक्षा जास्त नसावे. ज्या कलाकारांची उपजिविका फक्त कलेवरच अवलंबून आहे असे कलाकार तसेच जे कलाकार फक्त कलेवरच अवलंबून होते मात्र सध्या त्यांना इतर कोणत्याही मार्गाने उत्पन्न नाही असे कलाकार. केंद्र किंवा राज्य शासनाच्या महामंडळे व इतर कोणत्याही नियमित मासिक पेन्शन योजनेचे इतर वैयक्तिक शासकीय योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहणार नाही. कलाकार, साहित्यिक महाराष्ट्राचा रहिवाशी असणे बंधनकारक आहे. 

अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे

वयाचा दाखला 50 पेक्षा जास्त (दिव्यांगांना वयामर्यादा 40 वर्षे), आधार कार्ड, उत्पनाचा दाखला 60 हजार रुपया पर्यंत (तहसिलदार), रहिवाशी दाखला तहसिलदार यांच्याकडून मिळालेले, प्रतिज्ञापत्र इतर कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेत नसले बाबत. पति-पत्नीचा एकत्रीत फोटो (लागु असल्यास), बॅक तपशिल बँक खाते क्रमांक व बँकेचा आयएफएससी कोड क्रमांकासह, अपंगत्वाचा दाखला (लागु असल्यास), राज्य केंद्र सरकारचे पुरस्कार प्रमाणपत्र (लागु असल्यास), नामांकित संस्था,व्यक्ती यांचे शिफारस पत्र (लागु असल्यास), विविध पुरावे, मोबाईल क्रमांक (आधार क्रमांकास व बॅकेस मोबाईक क्रमांक लिंक असणे आवश्यक आहे), शासन निर्णय तरतुदीनुसार सर्व अटी शर्ती लागु राहतील. 

या संबंधी अधिक माहिती नांदेड जिल्हा परिषदेचे संकेतस्थळ zpnanded.in वर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.  अपुर्ण अर्ज असल्यास किंवा चुकीची माहिती दिल्यास अर्ज फेटाळला जाईल, असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे नांदेड जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पं.) यांनी कळविले आहे. 

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्रमांक   1073 अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे ऑनलाईन उद्घाटन श्री गुरू गोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थ...