वृत्त क्र. 708
जिल्हास्तर सुब्रतो मुखर्जी कप फुटबॉल क्रीडा स्पर्धेसाठी
१३ जुलै पर्यंत ऑनलाइन प्रवेशिका सादर करण्याचे आवाहन
नांदेड दि. ९ जुलै :- महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयांतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,नांदेड यांचे संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षी शालेय खेळाडूंच्या क्रीडा कौशल्याला वाव देण्यासाठी व भविष्यातील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण व्हावेत या उददेशाने शासकीय जिल्हास्तर/ विभागस्तर/ राज्यस्तर सुब्रतो मुखर्जी फुटबॉल क्रीडा स्पर्धेचे आयोजन विविध वयोगटात करण्यात येते.
त्यानुषंगाने सन 2025-26 या शैक्षणीक वर्षातील जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल (15 वर्षे व 17 वर्षे मुले-मुली) क्रीडा स्पर्धा आयोजन 15 व 16 जुलै, 2025 या कालावधीत राजर्षी श्री छत्रपती शाहु सैनिकी विदयालय, शारदानगर, सगरोळी ता.बिलोली जि.नांदेड येथे करण्याचे निश्चित झाले आहे.
खेळाडूंचे वय 15 वर्षे मुले जन्मतारीख 01 जानेवारी,2011 किंवा त्यानंतर जन्मलेला असावा व 17 वर्षे मुले व मुली (ज्युनियर) 01 जानेवारी, 2009 किंवा त्यानंतर जन्मलेला असावा. त्याकरीता नांदेड जिल्हयातील (ग्रामिण क्षेत्र) शाळा/ क.महाविद्यालयाची प्रवेशिका 13 जुलै 2025 रोजीपर्यंत dsonanded या संकेतस्तळावर अधिकृत ऑनलाईन नोंदणी करुन त्याची एक प्रत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल इनडोअर हॉल, नांदेड येथे स्पर्धेदरम्यान सादर करावे
व अधिक माहितीकरीता चंद्रप्रकाश होनवडजकर (राज्य क्रीडा मार्गदर्शक) 7972953141 यांचेकडे संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले आहे.
००००००
No comments:
Post a Comment