Friday, September 27, 2024

 वृत्त क्र. 872

माहिती अधिकार दिन सोमवारी साजरा करण्याचे निर्देश 

नांदेड दि. 27 सप्टेंबर : माहितीचा अधिकार अधिनियम 2005 या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी 28 सप्टेंबर हा दिवस राज्यस्तरावर ‘माहिती अधिकार दिन’ म्हणून साजरा करण्यासाठी निर्देशित केले आहे. परंतु 28 व 29 सप्टेंबर 2024 या दिवशी सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे सदर कार्यक्रम 30 सप्टेंबर 2024 रोजी आयोजित करावा असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सर्व कार्यालयाना दिले आहेत.

 

शासन निर्णयात निर्देशित केल्याप्रमाणे अंमलबजावणी कार्यालय स्तरावरून करण्यात यावी. तसेच 30 सप्टेंबर रोजी आपल्या कार्यालयामार्फत आयोजित करण्यात आलेल्या कार्यवाहीचे अनुपालन अहवाल या कार्यालयास सादर करावा, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने परिपत्रकान्वये कळविले आहे.

00000

No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक  994 उपवासाला भगर खाताना काळजी घेण्याचे आवाहन  नांदेड दि. 22 सप्टेंबर :- उपवासाला मोठ्या प्रमाणात भगरीचे सेवन केले जाते. भगर ख...