Thursday, June 27, 2024

 वृत्त क्र. 539 

दिव्यांग व्यक्ती व संस्थांनी राष्ट्रीय पुरस्कारासाठी

ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

 

नांदेड, दि. 27 : केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालयाअंतर्गत दिव्यांगजन सशक्तीकरण विभागाच्या संकेतस्थळावर दिव्यांग व्यक्तींकरीता राष्ट्रीय पुरस्कार सन 2024 करीता ऑनलाईन माध्यमातून अर्जनामांकन मागविण्यात आले आहे. अर्ज 31 जुलै पर्यंत   www.awards.gov.in या संकेतस्थळावर  स्वीकारण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा समाज कल्याण कार्यालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक  994 उपवासाला भगर खाताना काळजी घेण्याचे आवाहन  नांदेड दि. 22 सप्टेंबर :- उपवासाला मोठ्या प्रमाणात भगरीचे सेवन केले जाते. भगर ख...