Thursday, November 24, 2022

 तंबाखू नियंत्रण पथकामार्फत माहूर येथे 9 तंबाखू विक्रेत्यांवर कारवाई

नांदेड (जिमाका) दि. 24 :- माहूर शहरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची विक्री व कोटपा 2003 कायद्याचे उल्लंघन होत असल्याची माहिती मिळताच जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण पथकाने माहूर शहरात अचानक धाड टाकून 9 तंबाखू विक्रेत्यांवर कारवाई केली. या कार्यवाहीत तंबाखू विक्रेत्यांवर 4 हजार 600 रुपयांचा दंड आकारला.

ही कार्यवाही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नीलकंठ भोसीकर व नोडल अधिकारी डॉ. हनमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात जिल्हा सल्लागार डॉ. साईप्रसाद शिंदे, कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. उमेश मुंडे, मानसशास्त्रज्ञ प्रकाश आहेर तसेच स्थानिक पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप-निरीक्षक संजय पवार व जमादार श्री. आडे आदी होते.

सार्वजनिक ठिकाणी तसेच शैक्षणिक अथवा शासकीयनिमशासकीय कार्यालयाच्या परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची विक्री अथवा सेवन किंवा साठवण होत असल्यास, जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष, जिल्हा रुग्णालयात तक्रार नोंदवून नांदेड जिल्हा तंबाखू मुक्त करण्याच्या अभियानास सहकार्य करावे असे, आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

0000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्रमांक   847   इस्राईलमध्ये  5  हजार रोजगाराच्या   संधी   नांदेड दि.  13  ऑगस्ट : -  जिल्ह्यातील पात्र उमेदवारांसाठी परदेशात रोजगार...