Tuesday, July 21, 2020


वृत्त क्र. 668   
दिव्यांगमित्र ॲपद्वारे नोंदणी सुरु
नांदेड, (जिमाका) दि. 21 :- जिल्ह्यातील दिव्यांगानी दिव्यांगमित्र ॲप डाऊनलोड करुन स्वत:चे नाव, जात प्रवर्ग, जन्म दिनांक, लिंग, मोबाईल क्र. आधारकार्ड क्रमांक, मतदान ओळखपत्र, धर्म, मतदान यादी भाग क्र. फोटो आदी माहिती 14 ते 31 जुलै 2020 कालावधीत ॲपद्वारे भरुन नोंदणी करावी, असे आवाहन नांदेड जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार यांनी केले.   
जिल्ह्यातील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांची "दिव्यांगमित्र" म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. दिव्यांग लाभार्थ्यांची माहिती ग्रामी पातळीवर लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत सदस्यदिव्यांग संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन http://divyangmitrananded.in या संकेतस्थळावर, गुगल प्ले स्टोअरवरुन दिव्यांगमित्र ॲप डाऊनलोड करावे. या ॲपवर दिव्यांगानी आपली नोंदणी करुन या योजनेचा लाभ घ्यावा. ॲपद्वारे नोंदणी करण्यात आलेल्या अर्जाची छाननी 1 ते 10 ऑगस्ट 2020 या कालावधीत करण्यात येणार आहे.
शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषदेच्या स्वउत्पन्नाच्या 5 टक्के निधी दिव्यांगासाठी राखीव ठेवण्या येतो. दिव्यांगाना या निधीतून लाभ देण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची बैठक नुकतीच 8 जुलै  रोजी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. विपीइटणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी, मनपा आयक्त सुनिल लहाने, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती ॲड. रामराव नाईक तसेच जिल्हा नियोजन अधिकारी  संजय कोलगणे, जिल्हा समाज कल्याण अधिकार  सतेंद्र विरेंद्र आऊलवार यांची उपस्थितहोत.
                                                      000000

No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक  994 उपवासाला भगर खाताना काळजी घेण्याचे आवाहन  नांदेड दि. 22 सप्टेंबर :- उपवासाला मोठ्या प्रमाणात भगरीचे सेवन केले जाते. भगर ख...