Wednesday, January 2, 2019


महाडीबीटी पोर्टलवर प्रलंबीत अर्ज त्वरीत पाठवावे
 - जिल्हाधिकारी डोंगरे
नांदेड, दि. 2 :- महाडीबीटी पोर्टलवरील प्रलंबित असलेल्या शिष्यवृत्ती, फ्री-शीप आदी अर्ज त्वरीत त्यांच्या लॉगीन आयडी वरुन वरिष्ठ कार्यालयास सोमवार 7 जानेवारी पर्यंत पाठवावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातील "भारत सरकार शिष्यवृत्ती" योजनेच्या अनुषंगाने  जिल्हाधिकारी डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली महाडीबीटी पोर्टल संदर्भात कार्यशाळा जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवन येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. या कार्यशाळेस समाज कल्याण अधिकारी  सतेंद्र आऊलवार यांच्यासह जिल्ह्यातील महाविद्यालयाचे प्राचार्य यांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी विद्यार्थ्यांना वेळेत शिष्यवृत्ती मिळाली पाहिजे याबाबत सर्व महाविद्यालयाच्या प्राचार्य यांनी काळजी घ्यावी अशा सूचना दिल्या. शिष्यवृत्तीच्या अनुषंगाने असलेल्या अडीअडचणीबाबत देखील चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिष्यवृत्ती मंजूर करण्यासाठी अचूक अर्ज भरण्यापासून ते मंजूर करणारे संबंधित घटकांना देखील गांभीर्य अवगत करावे व प्रशिक्षित करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
000000

No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक 980     महाराष्ट्र बाल कामगार (प्रतिबंध व विनियम) नियम 2025 हरकती व सूचना पाठविण्याचे आवाहन   नांदेड ,   दि.   19   सप्...