Wednesday, October 5, 2016

किनवट आदिवासी प्रकल्पस्तरीय
क्रिडा स्पर्धांचे शुक्रवारपासून आयोजन
नांदेड, दि. 5 :- एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय किनवट अंतर्गत असणाऱ्या शासकीय व अनुदानित आश्रम शाळांसाठी प्रकल्पस्तरीय क्रिडा स्पर्धाचे आयोजन शुक्रवार 7 ऑक्टोंबर ते रविवार 9 ऑक्टोंबर 2016 या कालावधीत करण्यात आले आहे.
किनवट प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या शासकीय व अनुदानित आश्रम शाळांच्या केंद्रस्तरीय क्रिडा स्पर्धा बोधडी, सारखणी, उमरी बा., सहस्त्रकुंड या केंद्रावर 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीत पार पडल्या आहेत. त्यापुढील टप्पा म्हणून 7 ऑक्टोंबर ते 9 ऑक्टोंबर या कालावधीत प्रकल्पस्तरीय क्रिडा स्पर्धाचे आयोजन शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा किनवट येथे करण्यात आले आहे.
या क्रिडा स्पर्धाचे उद्घाटन 7 ऑक्टोंबर रोजी  सकाळी 11 वा. सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांच्या हस्ते  होणार आहे. याप्रसंगी विद्यार्थ्यांचे संचलन होईल. तसेच या स्पर्धा दरम्यान 8 ऑक्टोंबर रोजी सांस्कृतिक  कार्यक्रमाचे आयोजन  करण्यात आले आहे. या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. भारुड यांचे हस्ते सायंकाळी 8 वा. करण्यात येईल.
या क्रिडा स्पर्धासाठी बोधडी, सारखणी, उमरी बा. व सहस्त्रकुंड या चार केंद्रातील एकूण 300 मुले व 300 मुली  सहभागी  होतील स्पर्धाचे नियोजन व व्यवस्थापन करण्यासाठी  ए. व्ही. आगळे, ए. न. झाडे, एन. आर. जाधव, यु. एम. बनसोडे, बी. एस. बोंतावार, एम.  एम. कांबळे यांच्या विविध समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत. या स्पर्धा शिक्षक, प्रशिक्षण, खेळाडू व पंच यांनी  खिलाडू वृत्तीने  सहभागी  होण्याचे आवाहन डॉ. भारुड यांनी केले आहे. तसेच क्रिडा प्रेमीने या स्पर्धांना उपस्थित राहून आदिवासी खेळाडुंना प्रोत्साहन दयावे, असेही म्हटले आहे.
0000000

No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक  994 उपवासाला भगर खाताना काळजी घेण्याचे आवाहन  नांदेड दि. 22 सप्टेंबर :- उपवासाला मोठ्या प्रमाणात भगरीचे सेवन केले जाते. भगर ख...