Monday, November 10, 2025

वृत्त क्रमांक 1174

उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र दाखल करते वेळेस अवलंब करावयाची कार्यपध्दत

नांदेड दि.9 नोव्हेंबर:- राज्य निवडणूक आयोगाने नांदेड जिल्ह्यातील 12 नगरपरिषदांसह एका नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकांचा कार्यक्रम 4 नोव्हेंबर 2025 रोजी घोषित केला आहे. त्यादिवशीपासून निवडणूक कार्यक्षेत्रात आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे. 

देगलूर, भोकर, धर्माबाद,  किनवट, उमरी,  हदगांव,  मुखेड,  कंधार, बिलोली, कुंडलवाडी, मुदखेड,  लोहा या 12 नगरपरिषदांसह, हिमायतनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीची प्रक्रीया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पडावी यादृष्टीने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 नुसार उमेदवारांने नामनिर्देशन पत्र दाखल करतेवेळेस अवलंब करावयाची कार्यपध्दतीबाबत आदेश निर्गमित केले आहेत.

नांदेड जिल्ह्यातील 12 नगरपरिषद व एका नगरपंचायतीच्या निवडणूक कालावधीत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करते वेळेस कार्यालयाच्या 100 मी. च्या बाहेर वाहने व मिरवणूक थांबवावी व वाहनांच्या ताफ्यामध्ये तीनपेक्षा जास्त मोटारगाड्या, वाहनांना, तसेच नामनिर्देशनपत्र दाखल करते वेळेस निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात उमेदवारासोबत सूचक, अनुमोदक अथवा दोन व्यक्ती असे तीन पेक्षा जास्त व्यक्तीना तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयात नामनिर्देशपत्र दाखल करते वेळेस कार्यालयाच्या परिसरात मिरवणूका, सभा घेणे, कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणे, वाद्य वाजविणे किंवा गाणी म्हणने आणि कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे असे, आदेश जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी निर्गमित केले आहेत.  

हा आदेश नांदेड जिल्ह्यातील सर्व 12 नगरपरिषद एका नगरपंचायत निवडणूकीच्या अनुषंगाने संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयाच्या हद्दीत 10 नोव्हेंबरचे सकाळी 6 वाजेपासून ते 26 नोव्हेंबर 2025 चे मध्यरात्रीपर्यत अंमलात राहील. 

00000

No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक 1277   जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दी विक्रीसाठी उपलब्ध   नांदेड (जिमाका) ,  दि .   5 :-   जिल्हा माहिती कार्यालय ,   नांदे...