वृत्त क्रमांक 1069
दिपावलीसाठी तात्पुरत्या फटाका परवाना अर्जाला मुदतवाढ
नांदेड, दि. ८ ऑक्टोबर : दिपावली सण २०२५ अनुषंगाने तात्पुरत्या फटाका परवान्यांबाबत अर्ज स्वीकृतीसाठी शुक्रवार १० ऑक्टोबर २०२५ पर्यंत मुदतवाढ करण्यात आली आहे. याअनुषंगाने तात्पुरत्या फटाका परवान्यांबाबत जिल्हादंडाधिकारी कार्यालयाचे समक्रमांकीत पत्र दिनांक १५ सप्टेंबर २०२५ रोजी जाहीर प्रगटन करण्यात आले होते. या प्रगटनामध्ये हा अंशतः बदल करण्यात आला आहे.
दिपावली उत्सव यावर्षी दिनांक १७ ते २३ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत साजरा होणार आहे. त्यानुसार नांदेड महानगरपालिका हद्दीतील तात्पुरते फटाका परवाने सेतू समिती, जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड तसेच जिल्ह्यातील उपविभागीय कार्यालयामार्फत त्यांच्या कार्यक्षेत्रातील परवाना अर्ज विस्फोटक अधिनियम २००८ नुसार स्वीकृत केले जात आहेत. पूर्वी अर्ज स्वीकृतीचा कालावधी १६ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर २०२५ असा जाहीर करण्यात आला होता. मात्र आता अर्ज विक्री व स्वीकृतीसाठीची मुदतवाढ शुक्रवार दिनांक १० ऑक्टोबर २०२५ पर्यंत देण्यात आली आहे. तथापि, १५ सप्टेंबर २०२५ रोजी दिलेल्या जाहीर प्रगटनातील इतर सर्व अटी व शर्ती पूर्ववत राहतील, असे जिल्हादंडाधिकारी कार्यालय नांदेड यांनी कळविले आहे.
000000
No comments:
Post a Comment