वृत्त क्रमांक 1125
महादेवा " योजनेंतर्गत 13 वर्षाखालील मुले व मुलींच्या फुटबॉल खेळाडू निवड चाचणीचे आयोजन"
नांदेड दि.२५ ऑक्टोबर :- मुख्यमंत्री यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली प्रोजेक्ट “महादेवा” ही योजना महाराष्ट्रातील 13 वर्षांखालील मुलगा‑मुलींच्या फुटबॉल कौशल्याचा शोध घेण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. ही निवड प्रक्रिया तीन टप्प्यांत पार पडणार आहे.
जिल्हास्तरावरील निवड चाचण्या, प्रादेशिक फेरी आणि अंतिम निवड फेरी. अंतिम टप्प्यात 60 मुलांची निवड सीआयडीसीओ ग्राऊंड, खारघर येथे आणि 60 मुलींची निवड डब्ल्यूआयएफए कूपरेज मैदान, मुंबई येथे केली जाईल.
यापैकी प्रत्येकी 30 मुलगा‑मुलींची निवड केली जाईल आणि त्यांना पाच वर्षांची एकात्मिक शिष्यवृत्ती दिली जाईल, ज्यामध्ये फुटबॉल प्रशिक्षणासोबत शैक्षणिक विकासाचाही समावेश असेल. निवड झालेल्या खेळाडूंना 14 डिसेंबर रोजी मुंबईत येणाऱ्या आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्टार लिओनेल मेस्सी यांच्या फुटबॉल क्लिनिकमध्ये सहभागी होण्याची अनोखी संधी मिळेल. ही योजना MITRA, क्रीडा विभाग, WIFA, CIDCO आणि VSTF यांच्या संयुक्त विद्यमाने राबविली जात असून, राज्यातील फुटबॉल क्षेत्र अधिक मजबूत करण्याचा उद्देश आहे.
सर्व जिल्हे, संस्था आणि माध्यमांना व्यापक प्रसिद्धी देऊन अधिकाधिक नोंदणीसाठी प्रोत्साहन देण्याचे आवाहन करण्यात येत आहे. इच्छुक खेळाडूंनी निवड चाचण्यांपूर्वी दिलेल्या गूगल फॉर्मद्वारे नोंदणी 26 ऑक्टोंबर,2025 पर्यंत करणे आवश्यक आहे.
त्यानुषंगाने नांदेड जिल्हा अंतर्गत जिल्हास्तरीय " महादेवा " योजनेंतर्गत 13 वर्षाखालील मुले व मुलींच्या फुटबॉल खेळाडू निवड चाचणी आयोजन दिनांक 30 ऑक्टोंबर, 2025 या कालावधीत उस्मानशाही मील फुटबॉल ग्राऊड, नांदेड येथे करण्यात आलेले आहे. याकरीता जिल्हयातील सर्व शाळांची समन्वय साधून खेळाडूंना चाचणीसाठी पाठवण्याबाबत सूचना दयाव्यात. सर्व खेळाडूंनी चाचणीस्थळी येण्यापूर्वी गुगल नोंदणी लिंक https://forms.gle/6PAR766JoC9d2QH26, https://forms.gle/ctCMRZ4FZDxwYEvA7 या लिंकद्वारे (Google registration link) आपली नोंदणी पूर्ण केली आहे, याची खात्री करावी, खेळाडूंना त्यांचS मूळ आधार कार्ड आणि जन्म प्रमाणपत्र सोबत आणणे आवश्यक आहे.
राज्यात फुटबॉल खेळाच्या विकास व प्रसारासाठी व राज्यात फुटबॉल खेळाची लोकप्रियता वाढावी म्हणून फुटबॉल खेळातील तांत्रिक प्रशिक्षण, क्रीडा नैपुण्याचा शोध घेण्यासाठी तसेच योजनाबध्द प्रशिक्षण, पायाभूत सुविधा यांना चालना मिळणार आहे. याकरीता नांदेड जिल्हयातील जिल्हा व तालुकातील सर्व क्लब व शाळांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी 13 वर्षाखालील मुले व मुलींनी "महादेवा" जिल्हास्तर फुटबॉल स्पर्धेत जास्तीत-जास्त संख्येने सहभागी व्हावे व अधिक माहितीकरीता विपुल दापके (क्रीडा अधिकारी) 9511724095 व सय्यद साजीद (संघटना) 9823039892यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले आहे.
0000
No comments:
Post a Comment