Monday, October 6, 2025

वृत्त क्रमांक 1060

नवयुगीन व पारंपारिक अल्पकालीन अभ्यासक्रमांचे उद्घाटन 8 ऑक्टोबरला

नांदेड, दि. 6 ऑक्टोबर : राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये चालविण्यात येणाऱ्या नवयुगीन व पारंपारिक अल्पकालीन अभ्यासक्रमांच्या पहिल्या तुकडीचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ८ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ३ वा. ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. या उपक्रमाअंतर्गत अंदाजे २ हजार ५०६ तुकड्यांमध्ये प्रशिक्षण सुरू होणार असून, या कार्यक्रमाचे आयोजन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत करण्यात आले आहे.

या ऑनलाईन उद्घाटन सोहळ्यास नांदेड जिल्ह्यातील सर्व शाळांमधील शिक्षक, महाविद्यालयीन कर्मचारी, विद्यार्थी, पालक तसेच विविध संस्थांतील कर्मचारी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन श्री गुरू गोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सचिन सुर्यवंशी यांनी केले आहे.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत राज्यातील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित न्यू एज अल्पमुदत अभ्यासक्रम सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले होते.

नांदेड येथील श्री गुरू गोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत एकूण ८ प्रकारचे अल्पमुदतीचे व्यवसाय अभ्यासक्रम राबविण्यात येणार असून, या माध्यमातून प्रशिक्षणार्थी व बेरोजगार युवक-युवतींना प्रगत कौशल्यावर आधारित प्रशिक्षण मिळणार आहे. त्यामुळे त्यांच्या रोजगार व स्वयंरोजगार क्षमतेत वाढ होणार आहे. सदर कार्यक्रमाला नांदेड जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन श्री गुरुगोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सचिन सूर्यवंशी यांनी केले आहे.

0000

No comments:

Post a Comment

    वृत्त हिंद की चादर समागम कार्यक्रमातून आज लाखो भाविक घेणार प्रेरणा  ▪️उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री देवेंद्र फडण...