Wednesday, September 3, 2025

वृत्त   

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना आणि पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना


शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी ऑनलाईन अर्जाची अंतिम तारीख 18 सप्टेंबर 

 

नांदेड, दि. सप्टेंबर :- इतर मागासवर्गीय,विमुक्त जाती,भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी  ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना व पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेअंतर्गत 2025-26 शैक्षणिक वर्षासाठी शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी 01 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर, 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. लातूर प्रादेशिक विभागातील लातूरधाराशिवनांदेड व हिंगोली जिल्ह्यांतील शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेशासाठी इच्छूक विद्यार्थ्यांनी https://hmas.mahait.org  या संकेतस्थळावर अर्ज भरून आवश्यक कागदपत्रांसह संबंधित कार्यालयात सादर करावेतअसे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण (प्रादेशिक) विभागाचे उपसंचालक डॉ. तेजस माळवदकर यांनी केले आहे.

 

बारावी नंतरचे बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमास  (बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना संबंधित प्रवर्गनिहाय विहीत आरक्षणानुसार तसेच गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येणार आहे. वसतिगृह प्रवेशसाठी 01 ते 18 सप्टेंबर, 2025 या  कालावधीत अर्ज करावयाचा आहे. अर्जाची छाननी 19  ते 24 दरम्यान होईल. पहिली निवड गुणवत्तेनुसार यादी 25 सप्टेंबर, 2025 रोजी तर त्यानुसार प्रवेशाची अंतिम मुदत ऑक्टोबर, 2025 आहे. दुसरी निवड यादी 09 आक्टोबर, 2025 रोजी प्रसिद्ध  होणार असून प्रवेशासाठी अंतिम मुदत 17 ऑक्टोबर 2025 असेल.

 

वसतिगृहात  निवड झालेल्या विद्यार्थ्यांना निवासभोजन व अन्य सुविधा मोफत दिल्या जातात. शासकीय वसतिगृहासाठी पात्र असलेल्या तथापि गुणवत्तेनुसार व वसतिगृहाच्या क्षमतेअभावी वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज पंडीत दिनदयाळ स्वयंम व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी विचारात घेतले जातीलअसे लातूर इतर मागास बहुजन कल्याण (प्रादेशिक)विभागाने कळविले आहे.अधिक माहितीसाठी rddbahujanklatur@gmail.com  या ई-मेलवर किंवा 02382-299655 या क्रमांकावर संपर्क साधावा.

0000000

No comments:

Post a Comment

    वृत्त हिंद की चादर समागम कार्यक्रमातून आज लाखो भाविक घेणार प्रेरणा  ▪️उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री देवेंद्र फडण...