वृत्त क्रमांक 890
राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडाळाच्या
योजनेच्या लाभासाठी महामंडळाच्या ऑनलाईन नोंदणी सुरू
नांदेड, दि. 21 ऑगस्ट : राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ यांच्यामार्फत 13 उपकंपन्याची स्थापना शासनाने केली असून सदर उपकंपन्याचे कामकाज या महामंडळामार्फत सुरू करण्यात आले आहे. महामंडळाच्या विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी महामंडळाच्या वेबसाईडवर ऑनलाईन नोदणी करावी, असे आवाहन महामंडळाचे जिल्हाव्यवस्थापक यांनी केले आहे.
महामंडळ राबवित असलेल्या 6 योजना आहेत. त्यापैकी दोन योजना ऑफलाईन असून त्यांचे अर्ज जिल्हा कार्यालयात उपलब्ध आहेत. 1 लाखापर्यतची थेट कर्ज योजना व 20 टक्के बीज भांडवल कर्ज योजना तसेच ऑनलाईन योजना 4 आहेत.
या योजनेत वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना, शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना, महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना, सदर कर्ज योजना या बँकेमार्फत राबविल्या जातात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याने महामंडळाच्या वेबसाईडवर ऑनलाईन अर्ज www.msobcfdc.org या संकेतस्थळावर भरावा. अधिक माहितीसाठी महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या. जिल्हा कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन ज्ञान माता शाळेसमोर नांदेड फोन न. 02462-220865 येथे संपर्क साधावा असेही आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment