वृत्त क्रमांक 878
राहेगाव किकी पुलास उपविभागीय अधिकाऱ्यानी दिली भेट
पूर समस्या निवारणासाठी ग्रामस्थांशी साधला संवाद
नांदेड दि. 20 ऑगस्ट :- नांदेड तालुक्यातील राहेगाव-किकी येथील पुलावर सततच्या पावसामुळे पाणी येवून दोन गावांचा संपर्क तुटल्याची माहिती मिळताच नांदेडचे उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ व तहसिलदार संजय वारकड यांनी 19 ऑगस्ट रोजी स्थळ पाहणी केली. यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून समस्या जाणून घेतल्या व समस्याचे कायमस्वरूपी निराकरण करण्याच्या अनुषंगाने बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
तुप्पा महसूल मंडळातील राहेगाव व किकी या दोन गावांना जोडणारा पुल अरूंद व कमी उंचीचा आहे. त्यामुळे गोदावरी नदी पात्रातील पाणी पातळी वाढताच पुलावर पाणी येवून वाहतूक ठप्प होऊन या दोन्ही गावांचा संपर्क तुटतो. अलिकडे झालेल्या सततच्या पावसामुळे अंदाजे पाच फूट पाणी आले होते. ही माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, तहसिलदार संजय वारकड यांनी पुलाची पाहणी केली. सुरक्षिततेच्या दृष्टिने सतर्क राहण्यासाठी ग्रामस्थांना आवश्यक सूचना देवून चर्चा केली. यावेळी ग्रामस्थांनी पावसामुळे वारंवार पुलावर पाणी येवून अडचण भासत असल्याचे सांगीतले.
यावेळी वाजेगाव व तुप्पा महसूल मंडळाचे मंडळ अधिकारी प्रमोद बडवणे, ग्राम महसूल अधिकारी गौतम पांढरे, राहेगावचे सरपंच विलास इंगळे, किकीचे सरपंच रवी देशमुख, पांगरीचे सरपंच हनुमंत घोगरे, राहेगावचे पोलीसपाटील संजय इंगळे , किकीचे पोलीस पाटील गोविंद तेलंगे, गोपाळचावडीचे पोलीस पाटील विजय खटके, तुप्पाचे पोलीस पाटील वसंत पल्लेवाड, भायेगावचे पोलीस पाटील प्रतिनिधी शिवानंद खोसडे, रामदास इंगळे, आनंद इंगळे, नरहरी भोंग, राजू इंगळे, शिवाजी किरकण, गजानन किरकण, जळबा तेलंगे, प्रताप मगर आदि उपस्थित होते.
00000
.jpeg)
.jpeg)
No comments:
Post a Comment