वृत्त क्रमांक 845
एफसीए अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न
नांदेड दि. 13 ऑगस्ट :- विविध शासकीय, निमशासकीय कामांसाठी वनखात्याच्या जमिनी प्रदानाबाबत वनसंरक्षण अधिनियम, (सुधारणा) 2023 बाबत अनुसरायची कार्यपद्धतीबाबत आज कार्यशाळा संपन्न झाली. ही कार्यशाळा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनाच्या कॅबिनेट हॉलमध्ये आयोजित करण्यात आली होती.
या कार्यशाळेस निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, उपवनसंरक्षक केशव वाबळे यासोबत सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, महावितरण तसेच इतर विभागाचे जिल्हास्तरीय अधिकारी, तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी उपस्थित होते.
ही कार्यशाळा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत वन विभागाच्या परवानगी प्रलंबित राहू नयेत, यामुळे जिल्ह्यातील कोणताही प्रकल्प अपूर्ण राहू नये यासाठी आयोजित केली होती. या कार्यशाळेस उपवनसंरक्षक केशव वाबळे यांनी वनखात्याकडे मंजुरीसाठी परिवेश पोर्टलद्वारे ऑनलाईन प्रस्ताव कशाप्रकारे करायचा व वन जमिनीच्या अनुषंगाने ना हरकत बाबत विस्तृत मार्गदर्शन केले.
00000


.jpeg)


No comments:
Post a Comment