Thursday, June 5, 2025

 वृत्त क्रमांक 576

प्रधानमंत्री धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत

किनवट तालुक्यात मांडवा व घोगरवाडी येथे शिबीर संपन्न 

आदिवासी समाजातील नागरिकांना विविध योजनेचा दिला लाभ    

नांदेड दि. 5 :- केंद्र शासनामार्फत सुरु करण्यात आलेल्या ‘प्रधानमंत्री धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियाना’च्या (PM DA-JGUA) अंमलबजावणीसाठी किनवट तालुक्यातील मांडवा व घोगरवाडी येथे आज 5 जून रोजी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 

या शिबिरात लाभार्थ्यांना आधारकार्ड, आरोग्य तपासणी, आयुष्यमन कार्ड वाटप, कृषी विभागामार्फत महाबीज बियाण्याचे वाटप किनवटचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी जेनित चन्द्रा दोन्तुला तहसीलदार डॉ. शारदा चौडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पंचायत समिती, तालुका आरोग्य अधिकारी व विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी, नागरीक आदींची उपस्थिती होती. सहाय्यक जिल्हाधिकारी जेनित चन्द्रा दोन्तुला तहसीलदार डॉ. चौडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिरात त्यांनी लाभार्थ्यांना योजनेबाबत मार्गदर्शन केले. या योजनेत नांदेड जिल्ह्याचा समावेश असुन किनवट तालुक्यातील 128 व माहूर तालुक्यातील 4 गावांचा समावेश आहे.

0000













 

No comments:

Post a Comment

  वृत्त क्रमांक 931   हवामान खात्याचा इशारा पावसाचा यलो अलर्ट जारी   नांदेड , दि. 2 सप्टेंबर :- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई य...