Tuesday, May 6, 2025

  वृत्त क्रमांक 477

अनु.जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती

 विद्यार्थ्यांना अर्ज करण्यास 20 मे 2025 पर्यत मुदतवाढ 

नांदेड दि. 6 मे :-  अनुसूचित जाती , नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशामध्ये विशेष अध्ययन करण्यासाठी प्रवेश घेतलेल्या सन 2025-26 या शैक्षणिक वर्षाच्या शिष्यवृत्तीसाठी महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर विस्तृत जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांना 2025-26 या शैक्षणिक वर्षाच्या शिष्यवृत्तीसाठी जाहिरातीद्वारे अर्ज स्विकारण्याची यापूर्वी अंतिम मुदत 30 एप्रिल 2025 दिली होती. त्याअनुषंगाने या जाहिरातीस आता अर्ज स्विकारण्याची अंतिम मुदतवाढ 20 मे 2025 दिली आहे.

तरी सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात अनुसूचित जाती, नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी परदेश शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अर्ज तात्काळ आयुक्त, समाज कल्याण आायुक्तालय, 3, चर्चपथ, पुणे-01 याचेस्तरावर अर्ज करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.  

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्रमांक   847   इस्राईलमध्ये  5  हजार रोजगाराच्या   संधी   नांदेड दि.  13  ऑगस्ट : -  जिल्ह्यातील पात्र उमेदवारांसाठी परदेशात रोजगार...