वृत्त क्रमांक 551
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नांदेड विमानतळावर आगमन
नांदेड दि. 29 मे :- राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज सकाळी येथील श्री गुरुगोबिंदसिंघजी नांदेड विमानतळावर आगमन झाले. यावेळी त्यांच्यासोबत वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲङ आशिष जयस्वाल यांचेही आगमन झाले.
जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी त्यांचे स्वागत केले.
यावेळी आमदार आनंदराव तिडके व विविध पदाधिकारी यांची उपस्थिती होती. त्यानंतर परभणी येथील नियोजित कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हेलिकॉप्टरने परभणी कडे प्रयाण केले.
000000
.jpeg)

.jpeg)


No comments:
Post a Comment