Friday, November 13, 2020

 

जिल्हा निर्यात प्रचालन परिषदेची समिती गठीत

उद्योजकांना नोंदणी करण्याचे आवाहन   

नांदेड, (जिमाका) दि. 13 :- नांदेड जिल्ह्यातील निर्यातवाढीसाठी विविध केंद्र व जिल्हा कार्यालये, औद्योगिक संघटना, निर्यात परिषदा, निर्यात सल्लागार इ. यांच्याशी सातत्याने पाठपुरावा, समन्वय व अडीअडचणी दूर करण्याच्यादृष्टिने जिल्हा निर्यात प्रचालन परिषदेस सहाय्य करण्यासाठी शासन निर्णयामधील मुद्दा क्र. 5 नुसार नांदेड जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा निर्यात प्रचालन परिषदेची समिती गठीत करण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय निर्यात करण्यास तयार असलेल्या व निर्यात करत असलेल्या उद्योजकांनी जिल्हा उद्योग केंद्र नांदेड येथे प्रत्यक्ष अथवा didic.nanded@maharashtra.gov.in या ईमेलवर नोंदणी करावी असे आवाहन महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र नांदेड यांनी केले आहे. 

राज्यातील लघू व मध्यम उद्योगांना आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये सहाय्य करण्यासाठी तसेच राज्यातील संभाव्य निर्यात क्षमता असलेल्या विविध क्षेत्रामधून निर्यातवृद्धी होण्यासाठी निर्यातदारांमध्ये जागरुकता आणून त्यांना स्पर्धात्मक बनविण्यासाठी तसेच राज्यातील निर्यातीला चालना देण्याचे दृष्टिने तसेच उद्योगांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी राज्यात महाराष्ट्र निर्यात प्रचालन परिषदची स्थापन करण्यात आली आहे, असेही  महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

000000

No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक  994 उपवासाला भगर खाताना काळजी घेण्याचे आवाहन  नांदेड दि. 22 सप्टेंबर :- उपवासाला मोठ्या प्रमाणात भगरीचे सेवन केले जाते. भगर ख...