Wednesday, December 11, 2019


‘‘मानवी हक्क दिन’’ निमित्त
कायदेविषयक शिबीर संपन्न
नांदेड, दि. 11 :- राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या वार्षिक सर्वसामान्य किमान कार्यक्रमांतर्गत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेडच्यावतीने आज नांदेड तालुक्यातील बोंढार येथे मानवी हक्क दिनानिमित्त कायदेवियक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. एस. रोटे, पॅनल विधीज्ञ अॅड. नय्युमखान पठाण, अॅड सुभा बेंडे, समाजसेवीका सौ अनुराधा मठपती, सरपंच सौ. शुभाबाई श्रावण सोनटक्के, पोलीस पाटील देवराव कोकरे, गावातील नागरिक उपस्थित होते.
मार्गदर्शन करताना न्यायाधीश श्री. रोटे यांनी गावकऱ्यांना त्यांच्या मुलभुत हक्कांबाबत व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाद्वारे दिल्या जाणाऱ्या मोफत विधी सहाय्य व विविध नुकसान भरपाई योजनांची माहिती दिली. विधीक्ष श्री बेंडे, व श्री पठाण यांनी मानवी हक्काबद्दल मार्गदर्शन केले.    
00000

No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक 980     महाराष्ट्र बाल कामगार (प्रतिबंध व विनियम) नियम 2025 हरकती व सूचना पाठविण्याचे आवाहन   नांदेड ,   दि.   19   सप्...