Tuesday, September 17, 2019

वृत्त क्र. 665
वैयक्तिक लाभाच्या विविध
योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड दि. 17 :- जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडील 20 टक्के सेस निधीतून सन 2019-20 या आर्थिक वर्षात वैयक्तिक लाभांच्या योजना व 5 टक्के दिव्यांग योजनांसाठी पात्र लाभार्थ्यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती स्तरावरुन सोमवार 30 सप्टेंबर 2019 पर्यंत अर्ज करावीतअसे आवाहन नांदेड जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
वैयक्तिक लाभांच्या योजनेत पुढील योजनेचा समावेश आहे. मागासवर्गीय प्रशिक्षीत महिलांना शंभर टक्के अनुदानावर शिलाई मशीन देणे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सायकलमागासवर्गीय पिठाची गिरणीमागासवर्गीय शेतकऱ्यांना एचपी विद्युत मोटार पुरविणे. मगासवर्गीय वस्तीत शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी मिनरल वॉटर प्युरीफाईड प्लॅट बसविणे. मागासवर्गीयांना झेरॉक्स (प्रिंटर, स्कॅनर व झेरॉक्स लहान मशीन) पुरविणे. अपंगाचे कल्याण व पूनर्वसनबाबत योजना राबविणे 5 टक्के निधी. ग्रामीण भागातील मागासवर्गीय बेरोजगारांना चारचाकी मालवाहतुक वाहन पुरविणे. या आदी योजनेचा यात समावेश आहे. अधिक माहितीसाठी संबंधीत पंचायत समितीस्तरावर संपर्क साधावा, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
000000

No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक 980     महाराष्ट्र बाल कामगार (प्रतिबंध व विनियम) नियम 2025 हरकती व सूचना पाठविण्याचे आवाहन   नांदेड ,   दि.   19   सप्...