Wednesday, February 27, 2019


मराठी भाषा गौरव दिनानिमित्त
जिल्हा ग्रंथालयात ग्रंथप्रदर्शनाचे द्घाटन
नांदेड दि. 27 :- दरवर्षी ज्येष्ठ कवी वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिन 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन म्हणुन साजरा करण्यात येतो. त्याअनुषंगाने कुसुमाग्रजांच्या व इतर मराठी ग्रंथाचे नांदेड जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक निलेश सांगडे यांच्या हस्ते करण्यात आले.
          यावेळी प्रा. अनिल कोलते व जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक, संजय कर्वे, मुक्तीराम शेळके, के.एम.गाडेवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. हे ग्रंथप्रदर्शन सर्वांसाठी खुले असुन सर्वांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक यांनी केले आहे.
000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्रमांक 931   हवामान खात्याचा इशारा पावसाचा यलो अलर्ट जारी   नांदेड , दि. 2 सप्टेंबर :- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई य...