Monday, October 29, 2018

पालकमंत्री रामदास कदम यांनी
केली शेतातील पिकाची पाहणी
 
          नांदेड,दि. 29 :- जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आज जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर बिलोली तालुक्यातील केरुर येथील शेतीला भेट देवून दुष्काळसदृष्य परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या पिकाची पाहणी केली.
यावेळी त्यांच्या समवेत आमदार हेमंत पाटील, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार सुभाष साबणे, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे आदि अधिकारी उपस्थित होते. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला यावेळी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनीही माहिती दिली.  
****

No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक  994 उपवासाला भगर खाताना काळजी घेण्याचे आवाहन  नांदेड दि. 22 सप्टेंबर :- उपवासाला मोठ्या प्रमाणात भगरीचे सेवन केले जाते. भगर ख...