Friday, February 2, 2018

उत्तर प्रदेशचे राज्यमंत्री
डॉ. महेन्द्र सिंह यांचा दौरा
नांदेड दि. 2 :- उत्तर प्रदेश राज्याचे ग्रामविकास, वैद्यकीय आणि आरोग्य विभागाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) तथा राष्ट्रीय मंत्री भाजपा डॉ. महेंद्र सिंह हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
शनिवार 3 फेब्रुवारी 2018 रोजी मुंबई येथुन देवगिरी एक्सप्रेसने सकाळी 8.40 वा. आगमन व 8.50 वा. शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. सकाळी 9.10 शासकीय विश्रामगृह येथे आगमन. सकाळी 10 वा. राज्यातील ग्रामविकास विभागाकडून केल्या गेलेल्या कामांची पाहणी व विभागीय अधिकाऱ्यांसमवेत चर्चा. लोकसभा क्षेत्र नांदेड येथील कार्यकर्ते व भाजप पदाधिकाऱ्यांसमवेत बैठकीस उपस्थिती. दुपारी 1 वा. वाहनाने परभणीकडे प्रयाण करतील.

000000

No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक   876   नुकसानग्रस्तांना शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल :  आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन   नुकसानीचे तात्काळ प...