Tuesday, September 19, 2017

किनवट तालुक्यातील ग्रामपंचायत मतदानासाठी
23 ऐवजी 26 सप्टेंबर रोजी स्थानिक सुट्टी जाहीर 
नांदेड दि. 19 :- किनवट तालुक्यातील भिमपूर / सिरमेटी, जरुर, मारेगाव (व), पिपरफोडी येथील ग्रामपंचायत क्षेत्रात सार्वत्रिक व रिक्त पदाच्या पोट निवडणुकीसाठी शनिवार 23 सप्टेंबर 2017 रोजीची स्थानिक सुट्टी रद्द करुन त्याऐवजी मंगळवार 26 सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आली आहे.
या क्षेत्रात मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी निवडणुक आयोगाच्या सुधारीत आदेशान्वये जिल्हाधिकारी नांदेड यांनी या मर्यादीत क्षेत्रापुरती मंगळवार 26 सप्टेंबर 2017 रोजी स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे.

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्रमांक   847   इस्राईलमध्ये  5  हजार रोजगाराच्या   संधी   नांदेड दि.  13  ऑगस्ट : -  जिल्ह्यातील पात्र उमेदवारांसाठी परदेशात रोजगार...