Thursday, January 7, 2021

 

सेवारत जवान गोरठकर यांना 

राज्य शासनाकडून 3 लाख रुपयाची आर्थिक मदत मंजूर

नांदेड, (जिमाका) दि. 7 :- बॉर्डर सेक्युरिटी फोर्सचे सेवारत जवान कॉन्स्टेंबल नायगाव तालुक्यातील रुई या गावातील भास्कर गंगाधर गोरठकर यांना राज्य शासनाकडून 3 लाख रुपयाची आर्थीक मदत मंजूर केली आहे.  कॉन्स्टेबल श्री.गोरठकर हे जम्मू कश्मिर  येथे गस्तीच्या  कर्तव्यावर असताना 23 डिसेंबर 2001  आंतकवादीने केलेल्या घातपाताच्या हल्यात त्यांच्या उजव्या पायाला बंदुकीच्या गोळ्या लागल्याने ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर सतत उपचार चालू होते. 

कॉन्स्टेबल भास्कर गोरठकर यांना कायमस्वरुपी 50 टक्के अपंगत्व प्राप्त झाल्याने त्यांच्या या प्रकरणाचा पाठपुरावा करुन त्यांना हा निधी मंजूर करण्यात आला आहे. श्री. गोरठकर यांची सेवा 21 वर्षे झाली असुन सध्या ते बॉर्डर सेक्युरीटी फोर्समधे दांतीवाडा गुजरातमध्ये कार्यरत आहेत.

देशाच्या संरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या सैनिकांना मदत व्हावी यादृष्टिने सशस्त्रसेना ध्वजनिधी जमा केला जातो. या निधीसाठी योगदान देवू इच्छिणाऱ्या दानशुरांनी अधिक माहितीसाठी नागरिकांनी 9403069447 या क्रमांकावर संपर्क करावा, असेही आवाहन  नांदेडचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी महेश वडदकर यांनी केले आहे.

000000

No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक  831      पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे बुधवारी आयोजन     नांदेड दि.  11  ऑगस्ट :- जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना...